8 December 2021 7:06 PM
अँप डाउनलोड

मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, २० सप्टेंबर | भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.

मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली, चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं – BJP state president Chandrakant Patil was offer me to join BJP says minister Hasan Mushrif in press conference :

चंद्रकांत पाटलांनी मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली:
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. (Chandrakant Patil was offer me to join BJP says minister Hasan Mushrif)

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप झिरो आहे, झेडपी नाही, महापालिका नाही, काहीच नाही शिल्लाक, त्यांना हटवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु होत्या, पण अमित शाहांच्या मैत्रीमुळे त्यांना हटवलं नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं:
चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावे, कुणाचा वापर करुन, माझ्या कुटुंबाची बदनामी करुन काही मिळणार नाही, सगळे आरोप खोटे आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP state president Chandrakant Patil was offer me to join BJP says minister Hasan Mushrif in press conference.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x