30 June 2022 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात

CM Uddhav Thackeray, Solapur tour

सोलापूर, १९ ऑक्टोबर : परतीच्या पावसाने राज्यात केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (१९ ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन ते सोलापूरसाठी रवाना झाले. त्यानंतर ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जातील. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसते अध्यक्ष शरद पवारही दौऱ्यावर आहेत.

अक्कलकोट तालुक्यात १४ ऑक्टोबर रोजी रात्रभर अतिवृष्टी झाली. त्याचवेळी जवळच असलेल्या कुरनूर धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे तेथून बोरी नदीत पाणी सोडणे भाग पडले. त्यामुळे सांगवीसह इतर अनेक गावांवर संकट कोसळले. शेतशिवार पाण्याखाली येऊ न शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. ऊ स, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. कुरनुर धरणातून सांगवी येथील बोरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सांगवी गावातील अनेक घरे पाण्याखाली गेली. काही घरांची पडछड होऊ न नुकसान झाले. गावकऱ्यांनी अंगावरील कपडय़ानिशी घरातून सुरक्षितस्थळी हलवले. घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाले. हिंदू व मुस्लीम स्मशानभूमीलाही अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसला.

विमानतळावर स्वागत:
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीकर, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत खासदार विनायक राऊत आदी हजर होते. विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी काही नेत्यांची जुजबी चर्चा केली. चला आपल्याला थेट शेतकऱ्यांना भेटायचे आहे असे सांगून ताफा अक्कलकोटच्या दिशेने निघण्याचे आदेश पोलिसांना दिले.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray is on a visit to Solapur on Monday (October 19) to inspect the damage caused by rains in the state. This time he will interact with the affected farmers in Sangvi, Akkalkot. He left Matoshri residence for Solapur at 8 am. They will then fly to Solapur and from there by car to Sangvi and Akkalkot.

News English Title: CM Uddhav Thackeray Solapur tour is started news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(410)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x