24 January 2025 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स

Netizans asking questions over election survey

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत? अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.

संपूर्ण कार्यकाळ राजीनामा नात्यात घालवणारी शिवसेना आणि केवळ भावनिक मुद्यांवर भाषणबाजी करणारे उद्धव ठाकरे यांनी ५ वर्षात काय विकास केला याच उत्तर एकाही वृत्तवाहिनीकडे नसताना असे सर्व्हे येतातच कसे असा प्रश्न समाज माध्यम उपस्थित करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी देखील स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांवर बिनकामाचे असे जाहीर केले आहेत. मग सामान्य माणसाची मतं कोणत्या आधारावर या सर्व्हेत नोंदवली जातात ते समजू शकलेलं नाही.

त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर रंगलेल्या या चर्चेतून अशा सर्व्हेवरच प्रश्न चिन्हं उपस्थित करण्यात येत आहे. सामान्य लोकांमध्ये केवळ एक भावनिक चेतना जागविण्याचे काम या पेड सर्वेमधून करण्यात येत आहे का असे ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x