18 September 2021 10:21 PM
अँप डाउनलोड

भाजपमधील आगामी पक्षफुटी झाकण्यासाठी धारावीतील दाक्षिणात्य शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा शो?

Shivsena, BJP, Party Workers

मुंबई: राज्यात महाशिव आघाडीने सत्ता स्थापन केल्याच्या धक्क्यातून भारतीय जनता पक्षातील नेते मंडळी अजून सावरताना दिसत नाहीत असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळे आमच्या पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा दिखावा करण्यात येतं आहे. धारावीत मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य लोकांचं साम्राज्यं असून अनेकांचे किरकोळ उद्योग या भागात चालतात. शिवसेनेचा इथे चांगला संपर्क असला तरी तिथला मराठी कार्यकर्ता हा प्रमुख भूमिकेत असतो. तसेच या विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवर मोठी धुसफूस वाढली असून काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार थेट त्याच्या संपर्कात असून बोलणी पूर्ण होताच स्वगृही परतणार आहेत असं वृत्त आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत या विषयावरून आपसात देखील चर्चा सुरु असल्याचं वृत्त आहे आणि त्या अनुष्ठानागे कमीत कमी १२-१५ आमदार भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे.

मात्र भविष्यात मिळविणारे राजकीय धक्के कसे पचवायचे या विवंचनेत भाजपचे नेते सापडले आहेत. त्यासाठी ज्या बाबतीत भाजपचा अनुभव आहे तेच हतखंडे वापरले जातं आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवरील लहानशी गोष्ट मोठी करून दाखविण्याचे खोडसाळ प्रयत्न सुरु आहेत असंच म्हणावं लागेल. कारण, मुंबई धारावीतील सामान्य दाक्षिणात्य शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देऊन मोठं मोठ्या पुड्या सोडल्या जातं आहेत.

त्यानुसार धारावीमधील सुमारे ४००० स्थानिक शिवसैनिकांना ज्यामध्ये ९० टक्के कार्यकर्ते हे स्थानिक दाक्षिणात्य लोकं आहेत. मात्र त्याला शिवसेनेला भगदाड असं दाखवून, शिवसैनिक पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर प्रचंड नाराज असल्याचा भास निर्माण करत आहेत. त्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रसार माध्यांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार बनवल्याने खूप नाराज आहेत. शिवसेनेने भ्रष्ट आणि प्रतिस्पर्धी पक्षांशी हातमिळवणी करणे गैर असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

पुढे स्थानिक भाजप नेते नाडार म्हणाले की, शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी झाल्यामुळे नाराज झालेले असंख्य शिवसैनिक शिवसेनेत आजी आहेत. आपण मागील ७ वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या विरोधात लढत असल्याचे नाडार म्हणाले. निवडणुकीदरम्यान त्यांनी घराघरात जात लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता त्या लोकांच्या नजरेला नजर आपण कशी देऊ शकतो, असे नाडार यांचे म्हणणे आहे. राज्यात प्रामाणिक सरकार स्थापन व्हावे यासाठी आपण लोकांकडे मते मागितली होती, याकडेही नाडार यांनी लक्ष प्रसार माध्यमांचे लक्ष वेधले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1141)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x