पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज आणि कोंढवा परिसरातील पाणीप्रश्न सुरळीत व्हावा यासाठी महापालिका दरबारी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु केला आहे. कात्रज आणि कोंढवा परिसरात सामान्य लोकांना पाणीप्रश्नावरून अनेक समस्या आहेत त्यासंबंधित तोडगा काढण्यासाठी नगरसेवक वसंत मोरे यांनी अतिरिक्त आयुक्त गोयल यांना भेटून लेखी निवेदन दिले. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर आणि पक्षाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत मनसे नगरसेवक वसंत मोरे सातत्याने नजर ठेवून असतात आणि प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचं पाहायला मिळालं आहे. नगरसेवक पदाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विकास कामांच्याबाबतीत त्याचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे.

दरम्यान, पुण्यात पक्ष बळकट करण्यासाठी देखील त्यांनी नेहमीच पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं आणि कार्यकर्त्यांचं देखील त्यांना नेहमीच सहकार्य लाभत ही जमेची बाजू आहे. नगरसेवक असलेले वसंत मोरे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यास तो आमदार आणि खासदारांना देखील विचार करायला लावणार आहे.

कात्रज-कोंढवा परिसराच्या पाणीप्रश्नावरून मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा पुढाकार