14 December 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

शिंदे गटाला सत्ता मिळणार | पण ती प्राप्त करण्याच्या प्रकारामुळे शिंदेंविरोधात लोकांच्या मनात प्रचंड खदखद

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बुधवारी कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद करतानाच राजीनामा देत असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे उतावळ्या भाजपने लगेच ‘ये तो सिर्फ झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है’ असं ट्विट केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र भविष्यात महाराष्ट्र आणि मुंबई विरोधी जे काही होईल त्याला शिंदे पिता-पुत्रच कारणीभूत असतील अशी जहरी टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. शिंदे हे आत्मसन्मान गुजरातच्या चरणी ठेऊन आल्याने ती पूर्णपणे भाजपकडून ऑपरेट केले जातील असं नेटिझन्स ठामपणे सांगत आहेत.

उद्धव ठाकरे यांचा संवाद :
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री पदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पद माझ्यासाठी काहीच नसल्याचं त्यांनी दाखवलं आणि मंत्रिपदांसाठी वसवसलेल्या शिंदे गटाविरोधातील संताप अजून प्रक्षोभक झाला आहे. स्वतः आनंद दिघे आज हयातीत असले असते तर त्यांनी देखील एकनाथ शिंदेंना माफ केलं नसतं असं अनेकांनी म्हटलं आहे.

शिंदे यांच्या विरोधात प्रचंड चीड :
शिंदेंनी हे केवळ राक्षसी राजकीय लालसेपोटी हे केलं असून त्यासाठी त्यांनी हिंदुत्व आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केल्याचं ठाम मत मराठी लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या समर्थनार्थ दिसणारे पदाधिकारी हे केवळ त्यांचे आर्थिक हितसंबंध टिकून राहावेत म्हणून सोबत आहेत, त्यात निष्ठा वगरे अजिबात नाही, असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. अनेक मराठी लोकांशी बोलल्यावर लोकांना उद्धव ठाकरेंप्रती सहानुभूती आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाल्याचं पाहायला मिळतय.

शिंदेनी अजून फडणवीसांना ओळखलंच नाही :
ज्या देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे हयातीत असताना त्यांच्या विरोधात आणि आपल्या समर्थकांमार्फत ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशा टॅगलाईन प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर खडसे, पंकजा मुंडे विनोद तावडे यांच्या विरीधात गोड बोलून राजकीय गेम केला ते एकनाथ शिंदेंना कधी एकटे पडतील हे शिंदेंना सुद्धा समजणार नाही असं देखील अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde anti rebel against but peoples are so angry over his rebel check details 30 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x