4 August 2020 1:39 PM
अँप डाउनलोड

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे: आशिष शेलार

BJP, Ashish Shelar, Sharad Pawar, Raj Thackeray

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीचा पोपट’ असा त्यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंची भाषणं बारामतीहून येतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजपा नेत्यांमध्ये डिजिटल युद्ध पेटलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी त्यांनी मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी पक्षाला रामराम केल्यावरुनही टोला लगावला आहे. शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, ‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”.

नेमकं काय ट्विट केलं आहे आशिष शेलार यांनी

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(21)#Raj Thackeary(632)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x