18 August 2019 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

वंचित आघाडीचं निवडणूक चिन्ह 'गॅस सिलेंडर'; विधानसभेत तरी शेगडी पेटणार का?

वंचित आघाडीचं निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलेंडर’; विधानसभेत तरी शेगडी पेटणार का?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची कपबशी औरंगाबाद वगळता सर्वच मतदार संघात फुटली होती. मात्र त्यानंतर देखील प्रकाश आंबेडकरांनी त्याच निवडणूक चिन्हासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्याच अनुषंगाने त्यांनी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना देखील विनंती केली होती. मात्र नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अत्यंत कठीण काम असल्याने तो संवाद पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता.

मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने नवं चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांपुढे नवं आव्हान उभं राहिलं आहे. दरम्यान पुढील महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगाने देखील आपली तयारी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरु केलं आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिलं आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह मिळालं आहे. आगामी निवडणुकीत या पक्षांनी उमेदवार उतरवल्यास त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर आणि शिलाई मशीन असेल. राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हं यापूर्वीचीच असतील. त्यामुळे वंचित आघाडीला नव्याने प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर या चिन्हाने आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारणाची शेगडी पेटणार का ते पाहावं लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(63)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या