27 July 2021 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार

Loksabha, Shivsena, Kirit Somaiya

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. ‘वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात १०० टक्के निवडणूक लढवणार,’ असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसैनिकांचा रोष असल्यानं अद्याप भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमय्या यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी थेट शिवसेना नेतृत्त्वावर तुटून पडलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या सध्या मातोश्री भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना-भाजपा युती झाली असली, तरी शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावरील राग कायम आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळेच आता सोमय्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यांना भेटीसाठी वेळ मिळालेली नाही.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(19)#Shivsena(1121)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x