18 September 2021 10:07 PM
अँप डाउनलोड

डीआरडीओ'चे माजी अध्यक्ष व्ही.के सारस्वत आरएसएस मुख्यालयात हजेरी लावत?

RSS, BJP, V K Saraswat, DRDO, Niti Ayog

नवी दिल्ली : भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्यामिशन शक्तीच्या यशाची चर्चा देशभर सुरु असताना अनेकांनी जुनी वृत्त प्रसिद्ध करत हे मिशन आधीच्या सरकारचे श्रेय असल्याचं म्हटलं होत. तर अनेकांनी यावर शास्त्रज्ञांनी बोलणं उचित असताना, मोदींनी देशाला संबोधण्याचा थेट संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीआरडीओच्या प्रमुखांनी मिशन शक्तीविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ”मिशन शक्तीच्या यशासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे १०० शास्त्रज्ञ सातत्याने काम करत होते. तसेच या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेने वाटचाल करत होते. या मोहिमेची इत्यंभूत माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत होती. तसेच डोवाल ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत होते.” असं म्हटलं.

तसेच डीआरडीओ’चे माजी अध्यक्ष आणि नीती आयोगाचे विद्यमान सदस्य व्ही.के सारस्वत यांनी देखील हे मिशन सध्याच्या मोदी सरकारच्या काळातील असल्याचं म्हटलं आहे. परंतु डीआरडीओ’चे माजी अध्यक्ष व्ही.के सारस्वत हे नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात देखील हजेरी लावून मोहन भागवत यांना वाकून नमस्कार करत असल्याचे फोटो व्हायरल झाल्याने समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. त्याबतचे अधिकृत वृत्त बिझनेस स्टॅंडर्ड’ने प्रसिद्ध केले होते त्याचा हा पुरावा.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)#RSS(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x