4 February 2023 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर? Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर! या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
x

मेरठ: मोदींच्या सभा फ्लॉप जात आहेत, पण कॅमेरे एकाच दिशेने मॅनेज?

Narendra Modi, Amit Shah, BJP

मेरठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकींसाठी देशभर सभांचा सपाट लावला आहे. त्यानुसार आज मेरठ येथे घेतलेल्या सभेमधून प्रचाराचे रणशिंग फुंकले. तसेच आजपासून पुढील तब्बल ४४ दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरामध्ये तब्बल १०० हून अधिक सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. आज मेरठ येथे त्यांनी घेतलेल्या पाहिल्याच सभेमध्ये काँग्रेसबरोबरच सर्वच विरोधीपक्षांचा मोदींने समाचार घेतला. परंतु या सभेला म्हणावी तितकी गर्दी जमलीच नाही, हे सिद्ध करणारे फोटो व्हायरल होत आहेत.

केवळ पहिल्या रांगेत भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांची गर्दी दिसत असली तरी मागच्या आणि दुसऱ्या बाजूने अनेक रांगामध्ये केवळ रिकाम्या खुर्च्याच होत्या अशा आक्षयाचे ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी रिट्वीट केले आहे. भाजपाच्या उमेदवारांची यादी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर मोदींने आज पहिली सभा घेतली. मोदींच्या या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली खरी मात्र ही गर्दी केवळ पहिल्या काही रांगेत होती. परंतु, मागे खुर्च्या रिकाम्याच असल्याचे ट्विट माया मिरचंदानी यांनी केले. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘पहिल्या रांगेत समर्थकांची गर्दी तर मागे रिकाम्या खुर्चा, पहिल्या सभेसाठी मोदी मेरठमध्ये दाखल झाले तेव्हाचे चित्र.’

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x