15 December 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

२०२० मध्ये अनेकांच्या लग्नात विघ्न आले | २०२१ मध्ये हे आहेत लग्नाचे शुभ मुहूर्त

Marriage Shubh Muhurat 2021, Free Marriage

मुंबई, २२ डिसेंबर: २०२० मध्ये कोरोनाने प्रवेश केला आणि अनेकांचे लग्नाचे स्पप्न भंगले. मात्र आता वातावरण निवळू लागलं आहे आणि कोरोना लस सुद्धा आल्याने अनेकांनी नवीन वर्षात लग्नाचे मुहूर्त शोधण्यास सुरुवात केली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. नवीन वर्ष 2021 मध्ये लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. ज्योतिष पंचागानुसार, जानेवारी महिन्यात लग्नाचा मुहूर्त अत्यंत कमी असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये केवळ 18 जानेवारी हा लग्नाचा मुहूर्त असणार आहे. याशिवाय मे 2021 मध्ये यावर्षी विवाहासाठी सर्वाधिक 16 मुहूर्त असणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी कोणताही शुभ काळ नाही. याशिवाय ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्येदेखील लग्नाचा शुभ मुहूर्त नाही. जर तुम्ही स्वत: च्या किंवा आपल्या घरातील इतर व्यक्तीच्या विवाहाचा विचार करत असाल, तर तुम्हाला 2021 या वर्षातील शुभ विवाहाच्या तारखा जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की उपयोगात येईल. (Marriage Shubh Muhurat 2021 for marriage next year).

जानेवारी 2021:
जानेवारी महिन्यात लग्नासाठी केवळ एकच शुभ मुहूर्त आहे. 18 जानेवारी रोजी तुम्ही विवाह करू शकता.

फेब्रुवारी 2021:
फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी एकही शुभ दिवस नाही.

मार्च 2021:
लग्नासाठी मार्च महिन्यामध्येदेखील कोणताही शुभ दिवस नाही.

एप्रिल 2021:
एप्रिल महिन्यात लग्नासाठी 8 शुभ दिवस आहेत. या दिवसांत शुभ विवाह केला जाऊ शकतो. एप्रिल महिन्यातील लग्नाच्या शुभ तारखा 22, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 अशा आहेत.

मे 2021:
मे महिन्यात शुभ विवाहासाठी अनेक मुहूर्त आहेत. या महिन्यात लग्नासाठी 16 शुभ दिवस आहेत. मे महिन्यात शुभ विवाहासाठी 1, 2, 7, 8, 9, 13, 14, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29 आणि 30 या तारखा आहेत.

जून 2021:
यावर्षी जूनमध्ये एकूण 8 शुभ दिवस आहेत. ज्यात विवाह होऊ शकतात. महिन्यातील 3, 4, 5, 16, 20, 22, 23 आणि 24 रोजी शुभ विवाह पार पाडला जाऊ शकतो.

जुलै 2021:
जुलैमध्ये लग्नासाठी फक्त 5 शुभ दिवस आहेत. 1, 2, 7, 13 आणि 15 जुलै रोजी विवाहसोहळा आयोजित केला जाऊ शकतो.

ऑगस्ट 2021:
या महिन्यात लग्नासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही.

सप्टेंबर 2021:
या महिन्यातदेखील लग्नासाठी कोणताही शुभ दिवस नाही.

ऑक्टोबर 2021:
ऑक्टोबरमध्येही लग्नासाठी एकाही शुभ दिवस नाही.

नोव्हेंबर 2021:
3 महिन्यांच्या प्रदीर्घ अंतरानंतर नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी 7 शुभ दिवस आहेत. या महिन्यातील 15, 16, 20, 21, 28, 29 आणि 30 रोजी लग्नसोहळा पार पाडता येऊ शकतो.

डिसेंबर 2021:
वर्ष 2021 च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी 6 शुभ दिवस आहेत. 1, 2, 6, 7, 11 आणि 13 डिसेंबर रोजी शुभ विवाह होऊ शकतात. अशा प्रकारे पुढील वर्षातील सर्व महिन्यातील शुभ विवाहाच्या तारखा पाहून तुम्ही आपल्या किंवा आपल्या नातेवाईकाच्या लग्नाची तारीख ठरवू शकता.

 

News English Summary: Corona entered in 2020 and shattered the marriage dreams of many. But now that the atmosphere is clearing up and the corona vaccine has arrived, many are looking for a wedding moment in the new year. There are a few days left until the start of the new year. The wedding moments in the new year 2021 are low. According to the astrological calendar, the wedding season is very rare in the month of January. In the first month of the new year, i.e. January, only January 18 will be the wedding moment. In addition, May 2021 will have a maximum of 16 wedding moments this year. In the early months of the year, February and March are no auspicious times for a wedding. Apart from this, there is no auspicious moment of marriage even in the three months of August, September and October. If you are thinking of getting married for yourself or someone else in your household, then the following information will definitely come in handy to know the happy wedding dates for the year 2021.

News English Title: Marriage Shubh Muhurat 2021 for marriage next year news updates.

हॅशटॅग्स

#Matrimony(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x