27 April 2024 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सत्तासुंदरी हातातून गेली | त्यामुळे शेलारांसह भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे

Former MP Raju Shetti, BJP MLA Ashish Shelar, Farm laws

कोल्हापूर, २४ डिसेंबर: माजी खासदार राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भारतीय जनता पक्षाची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे, अशी घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आशिष शेलार यांच्या हातून सत्तासुंदरी गेली आहे. त्यामुळे शेलारसह त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ध्यानीमनी नुसती सत्ताच दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.

आमदार आशिष शेलार यांची स्वत:ची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरांसारखी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी शरद पवारांचे पाय चाटण्यासाठी कोण गेले होते? असा सवाल शेट्टी यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहोत, ते अदानी-अंबानीसाठी लढा देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

तत्पूर्वी आमदार आशिष शेलार म्हणाले होते की, या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही मूठभर लोकांची भावना अडते आणि दलालांचे समर्थन करणारी आहे. केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा. त्याच शेलार यांनी राजू शेट्टींना तमाशातील तुणतुणे म्हटल्याचे कळताच शेट्टींनीदेखील शेलारांना चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

 

News English Summary: Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty has hit back at BJP leader Ashish Shelar for criticizing former MP Raju Shetty for playing the role of a middleman for the Legislative Council. Former MP Raju Shetty has slammed the Bharatiya Janata Party (BJP) along with Shelar for losing power. Speaking to media, Raju Shetty has taken note of Ashish Shelar’s criticism. Asht Shelar has lost power. As a result, their group, including Shelar, is in a state of delusion. Shetty criticized the Bharatiya Janata Party (BJP) leaders for meditating on power.

News English Title: Former MP Raju Shetti criticized BJP MLA Ashish Shelar over farm laws news updates.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x