15 June 2021 10:45 PM
अँप डाउनलोड

उध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दुख: दिसत नाही | पण भाजपाची तळी उचलणाऱ्या संपादकांचं दुख दिसतं

Former MP Raju Shetti, BJP Politics, Arnab Goswami, Anvay Naik

सांगली, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान माजी खासदार आण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Former MP Raju Shetti) यांनी Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

या विषयावर बोलताना ते म्हणाले की, “त्यांना त्यांची तळी उचलणाऱ्या एका संपादकाला वाचवायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला एका महिलेच्या पती आणि सासूने आत्महत्या केली असून एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे हे देखील अजिबात विसरता कामा नये. त्यांना एका कुटुंबाचं दुख: दिसत नाही, पण संपादकांचं दुख दिसतं. जर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून कुटुंब आत्महत्या करत असेल तर तो कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही असा सणसणीत टोला देखील त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला यावेळी लगावला.

केंद्रा सरकारच्या कृषी कायद्याला होत असलेल्या तीव्र विरोधाला जाणीवपूर्वक प्रादेशिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या विषयावर प्रतिक्रिया दिली.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, was arrested at his residence in Mumbai yesterday, accusing the Thackeray government of imposing emergency and dictatorship. Arnab Goswami has been arrested in a very private case in 2018. The BJP has strongly condemned the arrest of Arnab Goswami. Also, through social media, we have seen strong criticism of the Thackeray government. Meanwhile, Raju Shetty, a former MP and head of the Swabhimani Shetkari Sanghatana, has slammed the Bharatiya Janata Party (BJP) for criticizing the arrest of Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV.

News English Title: Former MP Raju Shetti slams BJP over politics after arrest of Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#RajuShetti(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x