12 December 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली - निलेश राणे

BJP leader Nilesh Rane, Anvay Naik family, Arnab Goswami

मुंबई, ०५, नोव्हेंबर: प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी अटक केलं होतं. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या देशभरातील आणि राज्यातील नेत्यांनी ठाकरे सरकार विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कालच्या घटनेचा संबंध भारतीय जनता पक्षाने थेट आणीबाणीशी जोडला तर, आता दुसरीकडे भारतीय जाताना पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांभोवतीच वेगळा संशय व्यक्त केला आहे.

मात्र, निलेश राणे यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून तेच टीकेचे धनी होण्याची अधिक शक्यता आहे, असं त्यांचं ट्विट सांगतं. एकूण त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांभोवतीच संशय व्यक्त केला आहे. वास्तविक देशात “कॅफे कॅफे डे”च्या अब्जाधीश मालकांनी देखील नुकसान आणि कर्जात बुडाल्याने आत्महत्या केली होती आणि असे अनेक प्रकार देशात घडले आहेत. परंतु, गाव गप्पांमधून मिळवलेल्या माहितीतून त्यांनी तथ्यहीन अंदाज व्यक्त करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय. श्रीमंतांकडे पैसा असतो म्हणजे तो सगळा बँकेच्या अकाउंटवर म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ३०० कोटी खात्यात जमा नसतात. त्यात अन्वय नाईक यांच्या पत्नीने काल म्हटल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या कामाचे पैसे न मिळाल्याने व्यवसायातील एकूण रोलिंगवर परिणाम झाला होता.

भाजप नेते निलेश राणे यांनी अर्णब यांच्या अटकेसंदर्भात संशय व्यक्त केला आहे. तसं सविस्तर ट्वीटचं त्यांनी केलं आहे. आता त्यांनी अजून एक विवादित ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचे कारण पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य लवकरच बाहेर येईल,’ असं म्हणत त्यांनी सध्या घडत असलेल्या घडामोडींवर संशय व्यक्त केला आहे.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, was arrested by Raigad police at his residence yesterday morning in connection with the suicide of renowned interior designer Anvay Naik. Meanwhile, after Arnab Goswami’s arrest, BJP leaders across the country and the state have raised a number of questions against the Thackeray government. While yesterday’s incident was directly linked to the BJP’s emergency, Nilesh Rane, the party’s leader and son of former chief minister Narayan Rane, has now expressed a different suspicion around his family over the Naik suicide case.

News English Title: BJP leader Nilesh Rane twit on Anvay Naik family News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x