23 September 2021 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

NCP, Sharad Pawar, Jayant Patil, MLA Jayant Patil, Supriya Sule

पुणे : शुक्रवारी एनसीपी’च्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच बोललं जात आहे. त्याला अनुसरून चित्र वाघ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि त्यासंबंधित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच त्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, एनसीपीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात घोषणा केली आहे. चित्रा वाघ यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहून त्यांना बढती देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये येत्या ३० जुलैला प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अकोला येथे मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर वैभव पिचड भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर असताना राष्ट्रवादीला धक्के बसले आहेत. यावर राष्ट्रवादी कशी सावरते तसंच चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हॅशटॅग्स

#NCP(367)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x