14 December 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

एकनाथ गायकवाड मुंबई कांग्रेसचे नवे कार्याध्यक्ष

Mumbai Congress, Former MP Sanjay Nirupam, Former MP Milind Devora, Congress, Rahul Gandhi, Sonia Gandhi, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर गेले काही दिवस अधांतरी असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर तोडगा निघाला आहे. मिलिंद देवरांचा राजीनामा मंजूर न करता ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड हे मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित आणि मराठी माणसाची नियुक्ती करून काँग्रेसने नवा डाव खेळलाय. एकनाथ गायकवाड हे उद्या २८ जुलैला सकाळी ११ वाजता.

मुंबई काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आपला नवा पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने गायकवाड यांचे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले मिलिंद देवरा यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून या पदाबाबतच संभ्रम कायम आहे. तसेच राहुल यांच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच होते. एकनाथ गायकवा हे लोकसभेचे दोन वेळा खासदार होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x