20 April 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांची मातोश्रीविरोधात राजकीय चिखलफेक

API Sachin Vaze, MLA Ravi Rana, Matoshri

मुंबई, १८ मार्च: सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप भाजपचे आमदार रवी राणा यांनी केला.

आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

दरम्यान, प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार एनआयएची टीम या प्रकरणात सह पोलिस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे आणि उप पोलिस आयुक्त (क्राइम) प्रकाश जाधव यांचे जबाबही नोंदवेल. NIA हे जाणून घ्यायचे आहे की कुणाच्या सांगण्यावरुन वाझेंना स्कॉर्पिओ प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. NIA भारंबे आणि जाधव यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचे मानते.

तसेच मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकण्यात आलेल्या परमबीर सिंग यांच्या सूचनेनुसार वाझे यांना या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. अशा परिस्थितीत, या प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्यापर्यंतही पोहोचू शकतो. ज्यूरिडिक्शन नसतानाही हे प्रकरण सचिन वाझे यांच्याकडे का सोपवले गेले, त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.

 

News English Summary: Matoshri is in trouble because of Sachin Vaze. Therefore, Sachin Waze can also be assassinated like Hiren Mansukh. BJP MLA Ravi Rana alleged that Sachin Vaze was not safe in the custody of Mumbai Police.

News English Title: Matoshri is in trouble because of former API Sachin Vaze said MLA Ravi Rana news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x