5 August 2021 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
x

राणेंना पंतप्रधान केले तरी कोकणातून शिवसेनेला हटवणे कोणाच्याही आवाक्याबाहेर - विनायक राऊत

Shivsena

मुंबई , ०८ जुलै | कोकणातील लोकांनी आपलं आणि शिवसेनेचं नातं अभेद्य आहे हे सिद्ध करून दाखवून दिलेले आहे. आज नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नाते तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्राला फक्त चार मंत्रीपद मिळतात हेच मोठं दुःख:
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी झालेला आहे. महाराष्ट्रातून चार जणांची वर्णी या मंत्रिमंडळात लागली असली तरी महाराष्ट्रातीलच दोन जणांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपद मिळतात हेच मोठं दुःख आहे. प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो याचं दुःख फार मोठं आहे. तसेच महाराष्ट्राला मंत्रिपद देत असताना अन्याय झाला असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.

पराभव काय असतो हे शिवसेनेने नारायण राणेंना दाखवून दिले आहे:
शिवसेनेशी लढण्यासाठी ज्यांची ताकद नाही अशांनी एखाद्या नारायण राणे किंवा अन्य कोणाचा वापर करायचा ठरवलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे. पराभव काय असतो ते यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने नारायण राणेंना दाखवून दिले असल्याचं सांगत खासदार राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राणेंना मंत्रिपद देण्यात आलं का? यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबई महालापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. पण मुंबई आणि शिवसेना हे नातं मागच्या 30 वर्षांपासून अभेद्य आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरविण्याची ताकद कोणामध्ये नसल्याचं खासदार राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Vinayak Raut reply after Narayan Rane got ministry in Modi govt news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x