14 November 2019 1:08 PM
अँप डाउनलोड

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच कन्नड प्रेम: बेळगांव मराठी भाषिकांमध्ये नाराजी

बेळगांव : महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगांव मधील गोकाक तालुक्यातील तवग गावच्या एका मंदिराच्या उद्धघाटनाला हजेरी लावली होती आणि त्यावेळी त्यांनी ते कन्नड गीतांच्या ओळी ही गायले. यावेळी त्यांच्या सोबत बेळगांव चे पालक मंत्री रमेश जारकिहोळी ही उपस्थित होते. या घटनेनंतर बेळगांव मराठी भाषिकांमध्ये प्रचंड चीड पहायला मिळत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी बैठक घेण्यासंबंधित अनेक वेळा विनंती केली परंतु चंद्रकांत पाटलांनी केवळ चालढकल केली आणि आता बेळगांव मधील गोकाक तालुक्यातील तवग गावच्या एका मंदिराच्या उद्धघाटनाला हजेरी लावली आणि विशेष म्हणजे बेळगांव चे पालक मंत्री रमेश जारकिहोळी सुध्दा उपस्थित होते. हा मुद्दा आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

मुख्य म्हणजे सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याच्या ओली गाऊन बेळगांव मधील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याच्या प्रतिक्रिया मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर यांनी दिली असून इतकेच नाही तर चंद्रकांत पाटलांची सीमाप्रश्नाच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठी भाषिक युवकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या विषयावर जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र भाजप च गुजराती प्रेम माहित होतं, आता कन्नड प्रेमही माहित झालं अशी बोचरी टीका त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून व्यक्तं केली आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या