19 January 2022 12:09 AM
अँप डाउनलोड

डब्ल्यूईएफच्या बैठकीसाठी मोदी स्वित्झर्लंडला रवाना

नवी दिल्ली : आज तब्बल २० वर्षानंतर डब्ल्यूईएफच्या बैठकीला हजेरी लावणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी २० वर्षा पूर्वी म्हणजे १९९७ मध्ये देवेगौंडा यांनी डब्ल्यूईएफच्या बैठकीला उपस्थिती लावली होती.

डब्ल्यूईएफच्या स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ९ वाजता दिल्ली विमानतळावरून रवाना झाले असून ते संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान ते दावोस मध्ये दाखल होतील असा अंदाज आहे.

दावोस मध्ये भरणाऱ्या ह्या ४८ व्या पाच दिवसांच्या बैठकीत विविध जागतिक विषयांवर त्यात शिक्षण, कला, व्यापार, राजकारण आणि इतरही अनेक नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर चर्च्या होते. भारतातर्फे विविध विषयांशी संबंधित जवळ जवळ १३० प्रतिनिधी दावोस मध्ये दाखल होतील. भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती जगभरातील प्रतिनिधींना देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.

२२ तारखेला म्हणजेच सोमवारी मोदी जगातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत डिनर आयोजित करणार आहेत तर मंगळवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करतील.

भारतातील १३० प्रतिनिधींमध्ये मुकेश अंबानी, अदानी आणि किंग शाहरुख खान यांची प्रमुख उपस्थिती असेल. याच कार्यक्रमावेळी किंग शाहरुख खान याचा सन्मान केला जाणार आहे.

भारताबरोबरच इतरही देशांचे महत्वाचे प्रतिनिधी ही उपस्थिती लावतील त्यात फ्रान्सचे अध्यक्ष एमानुएल मॅक्रोन, इंग्लंडचे पंतप्रधआन थेरेसा, जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल, इटलीचे पंतप्रधान पाउलो गेटिलोअली आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेव यांचा समावेश असेल.

हॅशटॅग्स

#davos(2)#NAMO(10)#Narendra Modi(1657)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x