झेडपी व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान | राज्य सरकार व विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई, १३ सप्टेंबर | धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
झेडपी व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान, राज्य सरकार व विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष – Maharashtra election commission declared Zilla Parishad and Panchayat Samiti election :
निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी याबाबतची माहिती दिली. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.
या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे, असं मदान यांनी सांगितलं.
असा आहे निवडणूक कार्यक्रम:
15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर अर्ज दाखल करता येणार
21 सप्टेंबर अर्जाची छाननी होणार
29 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार
5 ऑक्टोबरला मतदान
6 ऑक्टोबरला निकाल
किती जागांसाठी निवडणूक:
जिल्हा परिषदेच्या 85 जागा
पचंयात समितीच्या 144 जगाा
किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?
धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16
नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra election commission declared Zilla Parishad and Panchayat Samiti election.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Notice Period Rule | तुम्ही नोटीस पिरियडची सेवा पूर्ण केल्याशिवाय नोकरी सोडू शकता का?, नियम काय आहेत जाणून घ्या
-
Multibagger Stocks | असा धमाकेदार शेअर निवडा, फक्त 50 रुपयाचा स्टॉक, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 2 कोटी रुपये केले
-
Twitter Report | पत्रकार, मीडिया संस्थांच्या ट्विटवर सरकारची बारीक नजर?, जगात असे ट्विट हटवण्यात भारत आघाडीवर - रिपोर्ट
-
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले
-
IOC Stock Price | हा शेअर तुम्हाला 64 टक्के परतावा देऊ शकतो, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
-
Insurance Premium | विम्याचा हफ्ता ठरवण्यात नवीन बदल, घर किंवा कारच्या कर्जाप्रमाणे विम्याचा हप्ता ठरवला जाणार
-
Incredible India Kerala Tourism | निसर्गरम्य केरळला भेट द्या, अलेप्पी, वायनाड आणि वरकला काय आहे ते नक्की पहा
-
Viral Video | तरुणांच्या पुलावरून नदीत उड्या, फाझील धाडस, मृत्यू अवघ्या काही इंचाच्या अंतरावरून परतला, पहा व्हिडिओ
-
Rules Change | चेकबुक नियमांपासून ITR फायलिंगपर्यंत आजपासून हे बदल केले जातील, तुमच्या खिशावर होणार परिणाम
-
Guru Vakri 2022 | गुरू वक्री होण्याचा परिणाम दिसणार, गुरु कृपेने या राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार