26 April 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत - नितीन राऊत

Minister Nitin Raut

नागपूर, १३ सप्टेंबर | काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर काँग्रेसकडून सर्वात टोकदार प्रतिक्रिया ठाकरे – पवार सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत – Minister Nitin Raut targets Sharad Pawar over his remarks on congress :

शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कधीही महाराष्ट्रात बसवता आलेला नाही. या विषयावरून राऊत यांनी पवारांना टोचले आहे. ममता बॅनर्जी, मायावती यांनी बहुमत मिळून पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश जिंकून दाखवले.

त्या मुख्यमंत्री झाल्या पण ज्यांना स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीही बसवता आलेला नाही ते काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. त्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे पहावे, अशा बोचऱ्या शब्दात नितीन राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

या आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर टीका केली होती. ज्यांना काँग्रेसने जमीन राखायला दिली त्या राखणदारांनीच जमीन हडपली, अशा शब्दांत नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यानंतर नितीन राऊत यांनी पवारांवर टीका केली आहे. काँग्रेसवरची पवारांची टीका यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Nitin Raut targets Sharad Pawar over his remarks on congress.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x