8 December 2021 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Man Infraconstruction Ltd | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील या स्मॉलकॅप स्टॉकने 300 टक्के रिटर्न दिला | वाचा सविस्तर Gen Bipin Rawat Chopper Crash | हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू Mastek Ltd | आशिष कचोलियांच्या पोर्टफोलिओतील हा मल्टीबॅगर स्टॉक नवीन ब्रेकआउटसाठी तयार | तुमच्याकडे आहे? Indo Count Industries Ltd | या स्टॉकमध्ये 1 वर्षात 40 टक्के रिटर्नची संधी | ICICI ब्रोकरेजचा खरेदी कॉल Closing Bell | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी | निफ्टीही प्रचंड वाढला India GDP Fitch Forecast | फिच रेटिंगने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला Bharti Airtel Ltd | या स्टॉकमध्ये 22 टक्के रिटर्नचे संकेत | ब्रोकरेजचा खरेदीचा कॉल
x

सत्तेचं दबाव तंत्र? पण प्रियांका गांधी रॉबर्ट वाड्रानां नेण्यासाठी बिनधास्त ईडी कार्यालयाकडे आल्या

नवी दिल्ली : काल ईडीने प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरांची मुख्यालयात तब्बल ९ तास चौकशी केली. परंतु, त्यांना नेण्यासाठी वढेरा यांच्या पत्नी प्रियंका गांधी ईडीच्या कार्यालयात बिनधास्त आल्याने सर्वच प्रसार माध्यमांना धक्का बसला. त्यांनाही काळा सूट परिधान केला होता आणि थेट ईडीच्या कार्यालयाबाहेरच येऊन थांबल्या.

दरम्यान, काही वेळाने वढेरा हे कार्यालयातून बाहेर आले आणि दोघे मिळून तेथून एकत्र निघून गेले. बुधवारी प्रथमच वढेरा हे ईडी कार्यालयात उपस्थित राहिले होते. त्यादरम्यान देखील प्रियंका गांधी त्यांना सोडण्यासाठी आल्या होत्या. ईडीने वढेरा यांनी विदेशात अवैधरित्या संपत्ती जमवल्या प्रकरणी आणि मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणी गुरूवारी दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार ते सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीयेथील जामनगर हाऊस येथील ईडीच्या कार्यालयात आले हजर झाले.

त्याआधीच त्याच्या एक तास आधी त्यांच्या वकिलांची टीम तिथे पोहोचली होती. दरम्यान, प्रियांका गांधी या सक्रिय राजकारणात आल्याने मोदी सरकार त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यासाठी त्यांचे पती वढेरा यांना त्रास देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. परंतु, प्रियांका गांधी बिनधास्त असल्याचं दिसत असून यासर्व विषयांवरून त्या भाजपला भर सभांमधून लक्ष करतील अशी शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Congress(526)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x