सिंधुदुर्ग, ०५ सप्टेंबर | चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केला. तसेच आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, अशी बोचरी टीकादेखील राणे यांनी राऊत यांच्यावर केली.
चिपी विमानतळाला अजूनही डीजीएसएची परवानगी नाही, कागदाचं विमान उडवणार का? – BJP MLA Nitesh Rane criticizes Shivsena MP Vinayak Raut on Chipi Airport issue :
चिपी विमातळावरून मागील काही दिवसांपासून राणे आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. त्यांच्या या माहितीनंतर कोकणवासी आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, राऊत यांच्या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेतलाय. चिपी विमातळावरुन विमानोड्डाण करण्यासाठी अजून डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही सातची तारीख त्यांनी कोठून आणली आहे. ते एकटे राहून कागदाचे विमान उडवणार आहेत का ? आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, असे नितेश राणे म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP MLA Nitesh Rane criticizes Shivsena MP Vinayak Raut on Chipi Airport issue.
