मल्टिप्लेक्स विरोधातील मनसेच्या आंदोलनाचा सामान्यांना मोठा फायदा होणार
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मल्टिप्लेक्स थिएटरमधील सामान्यांना न परवडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमती विरोधात आंदोलन छेडलं होत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमतीवरून राज्यसरकारला धारेवर धरलं होत आणि मल्टिप्लेक्स मालकांना ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना विकण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला होता.
आज त्याच आंदोलनाला यश आल्याची चिन्ह आहेत. कारण मनसेच्या आक्रमक आंदोलनानंतर आज मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासोबत तब्बल २ तास बैठक घेऊन अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान माघार घेण्यास मनसेने स्पष्ट नकार दिला आहे.
अमेय खोपकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील सगळ्या मल्टीप्लेक्सचे सीईओ आज राज ठाकरेंना भेटलेत. मल्टीप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थावर तोडगा निघणार आहे. मल्टीप्लेक्समध्ये विकली जाणारी पाण्याची बाटली, चहा-कॉफी, वडा-समोसा आणि पॉपकॉर्नचे दर ५० रुपयांच्या आत असतील जे सामान्यांना परवडतील. आमच्याकडून याबाबतचे सगळ्या मल्टीप्लेक्सला २-३ दिवसात लेखी आदेश दिले जातील निया तसं न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र केलं जाईल अशी माहिती दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेले आक्षेप आणि केलेल्या सूचना खालील प्रमाणे;
१. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात खाद्य पदार्थांचे दर अवाजवी असतातच पण प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार सर्रास आढळतात.
२. चित्रपटगृहातील कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो ह्या तक्रारी देखील अनेकवेळा आल्या आहेत.
३. मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते आणि ह्यासंबंधी तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.
४. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर ह्यासंबंधीची तक्रार कुठे करावी ह्याचा तपशील दाखवावा जेणेकरून प्रेक्षक नाडला जाणार नाही.
५. चहा, कॉफी, पाण्याची बाटली, सामोसा,पॉपकॉर्न आणि बटाटा वडा हे पदार्थ जे सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून खाल्ले जातात त्यांचे दर माफक असावेत, बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्षेप असण्याचं कारण नाही
६. लहान मुलांसाठीच अन्न, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना बाहेरील अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्याची परवानगी मिळायलाच हवी
राजसाहेबांनी केलेल्या सर्व सूचना मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने मान्य केल्या. आणि खालील मुद्द्यांवर येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याचं त्यांनी मान्य केलं.
१. पाण्याची बाटली, चहा, कॉफी, पॉपकॉर्न, सामोसा आणि बटाटावडा ह्यांचे दर पन्नास रुपयाच्या आसपास ठेवले जातील
२. प्रेक्षकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याचं निवारण करण्यासाठी कोणास संपर्क करावा ह्याचा तपशील चित्रपटगृहात पडद्यावर दाखवला जाईल
३. लहान मुलं, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना त्यांच्यासाठी आवश्यक अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्यावर कोणताही मज्जाव केला जाणार नाही.
ह्या बैठकीस राज ठाकरें बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, पुण्यातील माजी नगरसेवक आणि पुण्यात मल्टिप्लेक्स विरोधात आंदोलन छेडणारे किशोर शिंदे हे देखील उपस्थित होते.
मल्टिप्लेक्सच्या प्रतिनिधीं सोबत बैठक पार पडली असली तरी मनसेच्या वरील सर्व प्रमुख मुद्द्यांची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत झालेली असेल, ह्याची खातरजमा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः करून घेईल अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या