शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
CM Eknath Shinde | राज्यात शिंदे सरकार आल्यापासून एकावर एक धक्कादायक घटना घडत आहेत. एकाबाजूला रोजगारावरून तरुणांमध्ये असंतोष वाढत असताना दुसरीकडे राज्यात पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयए आणि ईडीने धाडी टाकल्या. या प्रकरणात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली असून, या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळचे काही व्हिडीओ समोर आले असून, या व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. दरम्यान, या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये. ‘शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी रोजगाराच्या मुद्यांवर रान पेटवल्याने शिंदे गट आणि भाजप भाजप कात्रीत अडकलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाविरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडूनदेखील सडकून टीका सुरु आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील तळेगावात वेदांत-फॉक्सोन नावाचा मोठा फ्रोजेक्ट येणार होता. पण राज्यातील सत्तांतरानंतर हा प्रोजेक्ट गुजरात राज्यात गेला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. वेदांता प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंनी आज तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढला.
TISS करणार मुस्लिम समाजाचा अभ्यास :
राज्यातील मुस्लिम समाजाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बुधवारी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची (TISS) नियुक्ती केली आहे. यापूर्वी महमूद-उर-रहमान समितीने यापूर्वी मुस्लिमांच्या स्थितीचा अहवाल सादर केला होता. या अभ्यासासाठी सरकारने 33.9 लाख रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. गेल्या काही वर्षांत मुस्लिमांना सरकारी योजनांचा फायदा झाला का, याचा अभ्यास हा गट करणार आहे.
महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजासाठी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचा पाहणी अहवाल TISS ने सादर करण्याचा सरकारी ठराव जारी केला आहे. TISS राज्यात मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या ५६ भागात अभ्यास करेल. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे. अभ्यास गट त्याद्वारे विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये मुस्लिमांचा सहभाग वाढवण्यासाठी उपाय सुचवेल. महमूद-उर-रहमान समितीनंतर मुस्लिम समाजाचा हा पहिला राज्यव्यापी अभ्यास असेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Eknath Shinde on attack of oppositions check details 24 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News