13 December 2024 2:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली

Uttarakhand Ankita Bhandari Murder

Ankita Bhandari Murder ​​| उत्तराखंडच्या ऋषिकेश जिल्ह्यातील कालव्यातून शनिवारी १९ वर्षीय अंकिता भंडारी हिचा मृतदेह सापडला. काही तासांनंतर अंकिता ज्या रिसॉर्टमध्ये काम करत होती, त्या रिसॉर्टला जमावाने आग लावली. अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तराखंडचे माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद आर्य यांचा धाकटा मुलगा पुलकित आर्य याचे हे रिसॉर्ट आहे. या घटनेनंतर भाजपनं विनोद आर्य यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

निलंबित भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी :
अंकिताचा मृतदेह ऋषिकेश जिल्ह्यातील चिल्ला कालव्यातून ताब्यात घेण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत महिलेचा भाऊ आणि वडील घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्य याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मृत अंकिता भंडारी ही लक्ष्मण झुला भागात असलेल्या वांतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. या हत्येतील सर्व आरोपींनी रिसॉर्टच्या मॅनेजरसह वादानंतर अंकिताला कालव्यात ढकलून दिल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शनिवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकितचा मोठा भाऊ आर्यन याला राज्य ओबीसी आयोगाच्या उपसभापतीपदावरून हटवण्यात आले.

अंकिता हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार :
अंकिता हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी सकाळी ट्विटरवर ट्विट करत मुलगी अंकिताचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने मन खूप व्यथित झाले आहे.

दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक पी. रेणुका देवीजी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली असून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय, मुख्यमंत्री धामी यांनी सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना राज्यभरातील रिसॉर्ट्सची तपासणी करण्याचे आणि बेकायदेशीरपणे रिसॉर्ट चालविणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uttarakhand Ankita Bhandari Murder locals torch Resort owned By Former BJP Ministers Son 24 September 2022.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x