27 November 2022 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 28 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे?
x

राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार?

Hindu Garva Yatra

Hindu Garva Garjana ​​| देशात सामान्य लोंकांसाठी महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे महत्वाचे झाले आहेत. दुसरीकडे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच वेंदांता सारखा १ लाख लोकांना रोजगार देऊ शकेल असा प्रकल्प तडकाफडकी गुजरातला गेल्याने तरुणांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.

तळेगावात जनआक्रोश मोर्चा  :
त्यालाच अनुसरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार म्हणून पुन्हा एकदा हिणवलं. “मुख्यमंत्र्यांनी एक-दीड महिन्याआधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की साहेब त्यांच्याकडेही 50 खोक्के पोहोचवा आणि एकदम ओक्के करा”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

इथे घटनाबाह्य सरकार :
गुजरातबद्दल मी काही चुकीचं बोलणार नाही. कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तिकडचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी बघितलं की इथे सरकार बदललं आहे. इथे घटनाबाह्य सरकार बनलं आहे. हे सरकार जे कोसळणार आहे. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. हे खोके सरकार बनल्यानंतर त्यांनी मौके पर चौका मारला आणि महाराष्ट्रातला प्रकल्प ते गुजरातला घेवून गेले. त्यांचा महाराष्ट्राकडे डोळा होताच. महाराष्ट्रात सरकार बदलतं कधी आणि चांगला प्रकल्प इतर राज्यात घेवून कधी जातो यासाठी ते प्रयत्नशील होते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘हिंदू गर्व गर्जना’ संपर्क यात्रा :
दुसरीकडे, राज्यातील तरुणांसाठी त्यांच्या भविष्याच्या अनुषंगाने रोजगार महत्वाचा मुद्दा झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री दिल्लीतून कानमंत्र घेऊन आल्यानंतर शिंदे गट तरुणांना धार्मिक मुद्द्यांवर विचलित करण्यासाठी कामाला लागला आहे असं म्हटलं जाऊ लागलय. कारण आज नाशिकमध्ये शिंदे गटाच्या मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या दरम्यान लावण्यात आलेल्या फलकावर ‘शिवसेना ‘हिंदू गर्व गर्जना’ संपर्क यात्रा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार याच शीर्षकाखाली शिंदे गट राज्यात धार्मिक मुद्दे गडद करणार आहे असं म्हटलं जातंय. मात्र यामुळे नेमका रोजगार निर्माण होणार आहे याची सुद्धा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता सुज्ञ तरुणांनी स्वतःच सावध राहण्याची गरज आहे असं म्हणावं लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde group Hindu Garva Yatra in state check details 24 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x