29 April 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

दिलासादायक संशोधन | काळजी घ्या, पण कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार... कारण?

Credit Suisse research

नवी दिल्ली, १७ एप्रिल: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

संक्रमणामुळे या 24 तासांच्या आत 1,338 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. मृतांचा हा आकडा सरकारी आहे. स्मशानघाट, कब्रिस्तानमध्ये पोहोचणारे मृतदेह यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. तिथून जे फोटो समोर येत आहेत, ती खरच भयावह आहेत. तुम्ही स्मशानघाट आणि कब्रिस्तानात लागलेल्या लांब रांगा पाहून याचा अंदाज लावू शकता.

आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन देशातील सर्वात जास्त रुग्ण असलेल्या राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करणार आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. या व्यतिरिक्त संसाधनांच्या संकटाविषयीही चर्चा केली जाईल. सोमवारी देशाच्या सर्व एम्स हॉस्पिटलचे डायरेक्टर्सची बैठक होईल. यामध्ये एम्समध्ये सुविधा वाढवण्यास सांगितले जाईल.

दरम्यान, क्रेडिट सुसेच्या एका संशोधनानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या गतीने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकते, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. तसेच एप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित होतील, असा अंदाज या संशोधनामधून वर्तवण्यात आला आहे.

या संशोधनामध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१ टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित झालेली होती. एप्रिलच्या अखेरीच यामध्ये ७ टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे. तर लसीकरणाच्या माध्यमातून देशातील १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील ४० टक्के लोकसंख्या ही कोरोनापासून मृत्यूच्या धोक्याबाहेर जाईल. एवढेच नाही तर २८ टक्के लोकसंख्येमध्ये संसर्गामुळे प्रतिकारशक्ती विकसित होई शकते. त्याशिवाय १२ टक्के लोक हे एप्रिलपर्यंत कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतील. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ८७ टक्के लोक हे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, दुसरीकडे लँसेट कोविड-१९ आयोगाने भारतात कोरोनाची दुसरी लाट वेळीच थोपवली गेली नाही तर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज १ हजार ७५० ते २ हजार ३२० मृत्यू होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

 

News English Summary: The speed with which people are being affected by the second wave of corona, according to research by Credit Suisse. The wave can travel just as fast, the research said. According to the study, by the end of April, 40 per cent of the country’s population will develop antibodies.

News English Title: Credit Suisse research over second wave on Corona Pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x