2 May 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

डॉक्टरांनी रेमडिसिवीर इंजेक्शन लिहून दिलंय, पण ते मिळत नाही, आता काय करावे? | डॉ. अमोल कोल्हे सांगतात...

Remedesiver injection

मुंबई, १७ एप्रिल:  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा झाला आहे. दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार आता रुग्णांच्या जिवावर उठला आहे. तो थांबवण्यासाठी रामबाण म्हणून आता प्रशासन सज्ज झाले असून हे इंजेक्शन आता फक्त रुग्णालयांनाच देण्यात येणार आहे. औषध दुकानांत रेमडेसिविरच्या विक्रीस बंदी घालण्यात आली असून हा काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांवर या इंजेक्शनच्या वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थातच गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन माफक दरात दिले जावे, हा यामागील उद्देश आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या बातम्या राज्यभरातून येत आहेत. असा काळाबाजार करणाऱ्या तिघांना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर पाेलिसांनी शुक्रवारी अटक केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायी आरोग्य सेवा अपूरी पडताना दिसत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव मुठीत आला आहे.अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेमडेसिवीरला पर्यायी कोणतं औषध आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे.

‘रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे? लक्षात घ्या, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर हे सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे,’ अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर पुरवठ्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे,’ असंही डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The number of corona patients in Maharashtra is increasing day by day. Alternative health care seems to be in short supply. The relatives of the patients have lost their lives while getting the injection of remedivir given to these coronary patients during treatment. Amol Kolhe has informed the citizens about the alternative medicine to Remedesivir.

News English Title: NCP MP Dr Amol Kolhe requested on Remedesiver injection shortage issue news updates.

हॅशटॅग्स

#AmolKolhe(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x