29 May 2022 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

BREAKING | देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण

Corona vaccination, India, January 16

नवी दिल्ली, ९ जानेवारी: कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे.

त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.

सरकारने कोव्हिशिल्ड आणि स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मर्यादीत वापर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज याबाबत महत्त्वाची घोषणा केली. देशात येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होणार आहे.

दरम्यान या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच यादरम्यान त्यांनी Co-WIN वॅक्सिन डिलिव्हरी मॅनेजमेंट सिस्टमच्या बाबतही माहिती घेतली. हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कोरोा लसीकरणावर रिअल टाईम लक्ष ठेवणं, लसीच्या साठ्याबाबातच्या सूचना, ते साठवण्यासाठी लागणारं तापमा आणि ज्यांना लस द्यायची आहे त्यांना ट्रॅक करण्याचं काम होणार आहे. आतापर्यंत ७९ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यावर रजिस्टर केलं आहे.

 

News English Summary: There has been a lot of news about corona vaccination. Corona vaccination will be carried out across the country from January 16. The central government has made an announcement in this regard. In this, first of all, health workers and frontline workers will be vaccinated. According to the central government, an estimated 3 crore workers will be vaccinated first.

News English Title: Corona vaccination will be carried out across the country from January 16 news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x