टिकटॉकला सरकारकडून बैठकीचे निमंत्रण, बाजू मांडण्याची संधी

नवी दिल्ली, ३० जून : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. भारत सरकारने या अॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अॅप्स सुरक्षित नसून, या अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अॅप्सचा समावेश होता. दरम्यान, बंदीची घोषणा कऱण्यात आल्यानंतर टिकटॉकने निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं म्हटलं आहे.
— TikTok India (@TikTok_IN) June 30, 2020
टिकटॉकने आपली बाजू मांडताना काय म्हटलं आहे ?
“भारत सरकारने एकंदर ५९ अॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटलं आहे.
News English Summary: We are following this order. We have been invited to a meeting with the officials of the concerned departments of the government in this regard and in this meeting we will have an opportunity to present our side and give an explanation said TikTok News Latest Updates.
News English Title: Tiktok invited for a meeting with the concerned department officials, an opportunity to present his side News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकस मध्ये, टॉप ब्रोकरेजने सांगितली टार्गेट प्राईस - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | आता संयम राखा, पुढे फायदाच फायदा होईल, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर्स सुस्साट तेजीत, तज्ज्ञांनी दिली होल्ड रेटिंग, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | उच्चांकापासून 53 टक्क्यांनी घसरलेला इरेडा शेअर्स खरेदीला गर्दी, टार्गेट जाणून घ्या - NSE: IREDA
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा डाऊनसाइड टार्गेट अलर्ट - NSE: IRFC