24 April 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

शिंदेजी! या नीच, लबाड राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहा | अनिल गोटेंचा मुख्यमंत्री शिंदेंना पत्रातून सल्ला

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील.

चर्चा फडणवीस नाराज असल्याची :
देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केल्यानंतर तसंच नंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून समोर आलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शपथही घेतली. यानंतर चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची. याबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती.

पवार म्हणाले होते :
पवार म्हणाले होते, ‘देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने ते नाराज असतील हे वाटत होतं. कारण त्यादिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ असू शकतात असं ऐकण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या पक्षात आदेश पाळण्याची परंपरा आहे. ती परंपरा त्यांनी पाळली. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असू शकतात असं मी ऐकलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एक अनुभवाचा सल्ला दिला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे ?
माननीय एकनाथ शिंदे साहेब,

आपली मुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल मी यापूर्वीच हृदयापासून अभिनंदन केले. मोगँबो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत, म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर आपलाच फायदा होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही. ही एक लाख टक्के खात्री देतो.

देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ! मी कुठलाही स्वार्थ, काडी ईतकी लाभाची अपेक्षा ठेवली नाही. या नीच, हलकट, पाताळयंत्री, दगलबाज, कपटी, खोटे बोलण्याचे अनन्यसाधारण अंगभूत गुण असलेल्या माणसावर श्रद्धा ठेवली. विश्वास ठेवला. हा माणूस चुकून सुध्दा दगलबाजी करणार नाही, असे मला वाटले होते.

मी त्यावेळी भाजपचा आमदार होतो. ते मुख्यमंत्री होते. रात्री दहा वाजेपासून दोन वाजे पर्यंत सलग चार तास चर्चा केली. मी स्वतःहून म्हणालो साहेब तुम्हाला काही अडचण असेल तर मोकळेपणाने सांगा. मी स्वतःहून बाजूला होतो. हा हलकट लबाड म्हणतो कसा ‘गोटेसाहेब तुम्ही पक्षाचे अॅसेट आहात. तुम्हाला मी शब्द नव्हे वचन देतो. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीर करतो.’

ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मी स्वतः भेटून आभार मानले, मला शुभेच्छा दिल्या. कुठलीही सभ्य सुसंकृत खानदानी व्यक्ती एखाद्या व्यक्तीने एवढे सर्व सांगितल्यावर अविश्वास दर्शवेल कसा ? मी प्रामाणिकपणे व एका निष्ठेने वागत आलो. स्वर्गीय वसंतराव भागवत, स्वर्गीय रामभाऊ गोडबोले अशा ऋषीतुल्य व्यक्तींचे संस्कार असल्याने व त्यांच्या देवरदुर्लभ सहवासामुळे तसेच दिलेला शब्द प्राण गेला तरी बेहत्तर पण तसूभरही मागे न हटणाऱ्या माननीय नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत संकटकाळी दिलेल्या आधाराच्या पाश्वर्वभूमीवर माझ्या मनात शंका येवूच कशी शकेल ?

स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावांनी तर सलग तीस वर्ष पुत्रवत प्रेम केले. स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी धाकट्या भावाप्रमाणे सांभाळले. कधी शब्द खाली पडू दिला नाही. कधी तर तोंडातून शब्द उच्चारण्यापूर्वीच मनकवडे असल्याप्रमाणे ओळखत !. स्वर्गीय बाळासाहेबांना लहर आली की, माझ्या दोन मुलांसह भेटायला बोलवत असत. अनेकदा आग्रहपूर्वक बरोबर जेवायला बसवत. माननीय उद्धवजी साक्षीदार आहेत.

मी एक लहान कार्यकर्ता ! मी त्यांना मदत तरी काय करणार ? साहेब तर, जाम खूष असत. अनेकदा प्रेमाने रागवत! किती दिवस अस कफल्लक राहशील? शिवसेनेत ये. तुझ्या आयुष्याचं सोनं करुन टाकतो. मला बाकी काही नकोच होतं. प्रेमाची भूक भागविली जात होती. मणी नावाचे एक पी. ए . होते. साहेबांनी त्यांना सांगीतलं आत्ताच्या आत्ता पत्रकारांना बोलवा “आज या गोट्याला, सोडायच नाही” असे म्हणाले.

पण साहेबांच्या प्रेमाशिवाय मला काही नकोच होतं. माननीय मनोहर जोशी सर यातील काही प्रसंगाचे साक्षीदार आहेत. तेलगी प्रकरणातून तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलो. पहिला फोन कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचा! दुसरा बाळासाहेबांचा, तिसरा नितीनजींचा ! साहेबांनी तर सौ. हेमा, मुलगा तेजस यांना आवर्जून जेवायला बोलवल !

मी हे सगळं यासाठी सांगितल की, आभाळाएवढ्या उंच उंच व्यक्तीनी मला दिलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी कुठे ? आणि फडणविसांची दगलबाजी कुठे ? आजही मनोहर जोशी सरांना विचारा सर्व संधी उपलब्ध असताना कधी एका तांबड्या पैशाची मदतीची अपेक्षा केली का ?

देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना माझा काडीचाही त्रास नसताना त्यांच्याइतपत हलकट, नीच, लबाड, धोकेबाज व भ्रष्ट दुराचारी मित्रांचा आत्मा संतुष्ट करण्यासाठी माझ्या सारख्या धनगर समाजातील कार्यकत्याचा छळ केला. मनाचा तका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही. अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे अशी मनोमन भावना असल्याने आलेला अनुभव शेअर केला. परमेश्वर अशा पशुतुल्य राक्षसी संकटापासून आपले रक्षण करो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

मानलात तर आपला मित्र,

अनिल गोटे

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former MLA Anil Gote waring alarm letter to CM Eknath Shinde check details 03 July 2022.

हॅशटॅग्स

#Ekanth Shinde(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x