11 August 2020 10:07 PM
अँप डाउनलोड

भारतीय लष्कराचा दावा नेपाळ सैन्यानं फेटाळला, ती पावलं हिममानवाची नव्हे, तर जंगली अस्वलाची

Indian Army, Nepal

नवी दिल्लीः लोक कथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय लष्कराच्या एका गिर्यारोहण पथकाला ९ एप्रिल २०१९ रोजी मकालु बेसकॅम्पच्या परिसरात ‘येती’ या पौराणिक प्राण्याच्या पावलांचे ३२ इंच लांब आणि १५ इंच रुंद अशा आकाराचे रहस्यमय ठसे आढळले. परंतु भारतीय लष्कराचा हा दावा नेपाळच्या सैन्याच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावला आहे. नेपाळ सैन्याच्या मते, अशा प्रकारची पावलं वारंवार त्या क्षेत्रात दिसत असतात. ती पावलं जंगली अस्वलाची असल्याचा खुलासाही नेपाळच्या सैन्यानं केला. भारतीय लष्कराला येतीच्या पाऊलखुणा दिसल्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. तसेच खरंच का ती येतीची पावलं आहेत हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. परंतु स्थानिक आणि आमच्या तज्ज्ञांच्या मते ती पावलं जंगली अस्वलाची आहेत, असं नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिग्यान देव पांडे यांनी सांगितलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#india(157)#IndianArmy(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x