13 July 2020 6:28 AM
अँप डाउनलोड

अमित शहांच्या प्रतिक्रियेतून शिवसेनेशी युती तुटल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित?

BJP President Amit Shah, Union Home Minister Amit Shah, Shivsena, Uddhav Thackeray

नवी दिल्ली: राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर भाजचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया मांडली आहे. जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची महायुती विधानसभेमध्ये विजयी झाली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं पंतप्रधान आणि मी काय म्हणत आलो. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. पण आता मात्र त्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे अशा शब्दात अमित शहा (BJP President Amit Shah) यांनी शिवसेनेनं केलेला आरोप फेटाळला आहे. शिवसेनेची ही मागणी मान्य नसल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. एएनआय (ANI) या वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विरोधक राज्यपालांनी वेळ दिला नाही हे विरोधकांचं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी साथ सोडली. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होतील हे मी भाषणांमध्ये अनेकदा बोललो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अनेकदा त्यांच्या सभांमधून हेच सांगितलं. देवेंद्र फडणवीसही सांगत होते त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अटी बदलल्या. त्यांच्या नव्या अटी आम्हाला मान्य नाहीत असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, त्यानंतर शिवसेनेने बदललेली भूमिका मान्य करणे शक्यच नव्हते. राष्ट्रपतींनी बहुमत दाखवून देण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही, ही टीका चुकीची आहे. राज्यात १८ दिवसांत बहुमत दाखवून सत्तास्थापनेचा दावा करणे शक्य होते. कोणालाच ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी राष्ट्रपतीची शिफारस केली. आताही राष्ट्रपती राजवट (President Rules) असली, तरी पक्ष वा पक्षांची आघाडी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करू शकते.

अमित शाह (Union Home Minister Amit Shah) म्हणाले, “बंद खोलीत झालेली चर्चा सार्वजनिक करणे आमच्या पक्षाची संस्कृती नाही. शिवसेनेने ऐनवेळी मागण्या वाढवल्या. आमच्या मित्रपक्षाने अशा अटी ठेवल्या ज्या आम्ही मान्य करु शकत नाही. शिवसेना आणि इतर पक्षांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी कमी वेळ दिल्याचा आरोपही शाह यांनी फेटाळला. ते म्हणाले, “राज्यपालांनी १८ दिवस वाट पाहिली. यापेक्षा अधिक कोठेही वेळ दिलेला नाही. राज्यपालांनी प्रत्येक पक्षाला लिखित स्वरुपात विचारणा केली. त्यानंतर निर्णय घेतला. असं असलं तरी आजही कुणीही सत्तास्थापनेचा दावा करु शकतं. ते पक्ष २ दिवस मागत होते, आम्ही त्यांना ६ महिने वेळ दिला. ज्यांना बनवायचे त्यांनी सरकार बनवावे.”

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(238)#Shivsena(891)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x