17 May 2021 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

व्हिडिओ; आम्ही आमच्या 'त्या' आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो: गडकरी

मुंबई : आम्ही सत्तेत येणार नाही याची भाजपला खात्री होती. त्यामुळेच आम्ही काही आश्वासन देत सुटलो. परंतु, आम्ही स्वतः त्या सामान्यांना दिलेल्या आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो’ असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वाहिनीच्या मुलाखतीत केलं होतं. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या गडकरींच्या त्या विधानाची दखल घेतली आणि त्यामुळे स्वतः गडकरी आणि भाजप वादातसापडण्याची चर्चा रंगली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही दिवसांपूर्वी कलर्स या मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’ या कार्यक्रमात मकरंद अनासपुरेंनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीत टोलबंदीवर चर्चा सुरू असताना अभिनेते नाना पाटेकरांनी,’तुम्ही निवडणुकीच्या वेळी काहीतरी वेगळं बोलता आणि नंतर काही तरी वेगळं बोलता’ असा टोला देखील गडकरींना लगावला होता.

त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, ‘मी वैयक्तिक अशी आश्वासनं दिली नाही. राजकारणात अशी विधानं करावी लागतात. त्यात आम्ही सत्तेत काही येणार नाही याचा आम्हाला दृढ विश्वास होता. त्यामुळे अनेकांनी सल्ले दिले की, तुम्ही बोला आणि अनेक आश्वासनं द्या ,जबाबदारी थोडीच येणार आहे. पण आता सत्तेत आलो. त्यामुळे विरोधक आता विचारतात तुम्ही असं बोलला होता. मग आता काय करणार? पण आम्ही त्यावर हसतो आणि पुढे जातो’ असं विधान गडकरींनी मुलाखतीत केलं होतं.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरींचा हा व्हिडिओ ट्विट केला असून ‘ जनतेच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा सत्तेच्या हव्यासापोटी बळी दिला आहे’ असं विधानही केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच गडकरींनी अजून तरी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काय आहे तो नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x