5 May 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी | राज ठाकरेंकडून मोदी सरकारचे आभार

Raj Thackeray

मुंबई, १६ एप्रिल: केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होतीच जिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ट्विट करताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

तत्पूर्वी, भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व निर्धारित एक वर्षाच्या आत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

 

News English Summary: MNS president Raj Thackeray has thanked Prime Minister Narendra Modi and the Center for allowing the Halfkin Institute to produce corona vaccine. Raj Thackeray has said that if we get such cooperation from the central government, we will overcome this crisis together.

News English Title: Raj Thackeray has thanked PM Narendra Modi for allowing Halfkin Institute to produce corona vaccine news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x