29 April 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

भाजपाला केवळ तगडी टक्कर देणे नव्हे तर मोठ्या बहुमताने पराभूत करण्याच्या योजनेवर राहुल गांधी केंद्रित, राजस्थानमध्ये कर्नाटक पॅटर्न

Rajasthan Politics

Rajasthan Politics | राजस्थान काँग्रेससंदर्भात दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अचानक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव घेतलं आणि बैठकीतअशोक गेहलोत ते सचिन पायलट यांच्यसह सर्वजण हसू लागले. गेहलोतजी सुद्धा लॅपटॉपमध्ये आहेत, त्यांनाही दाखवा असं ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले, तेवढ्यात मागून नेते म्हणाले की, डोक्यामागे स्क्रीन आहे, तेव्हा राहुल गांधी सुद्धा हसू लागले. विशेष म्हणजे केवळ विजय मिळविण्यासाठी भाजपाला तगड आव्हान देणे नव्हे तर काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांचे पक्षांतर्गत असलेले वाद मिटविण्यावर देखील राहुल गांधी व्यक्तिगत पातळीवर केंद्रित झाल्यावर पाहायला मिळाले आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या टीममध्ये भलताच जोश पाहायला मिळत आहे.

राजकीय विश्लेषक राजस्थान काँग्रेससाठी ही चांगली बातमी असल्याचं सांगत आहेत. या बैठकीला सचिन पायलट यांच्यासह राजस्थान काँग्रेसचे 30 बडे नेते उपस्थित होते. महत्वाच्या प्रशासकीय कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत या बैठकीला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल देखील उपस्थित होते. त्यावेळी स्पीकर सीपी जोशी, सुखजिंदर सिंह रंधावा, गोविंद सिंह डोटासरा और सचिन पायलट यांच्यासहित तीन सह प्रभारी सुद्धा उपस्थित होते.

याच बैठकीला मोहन प्रकाश, भंवर जितेंद्र सिंह, मंत्री प्रताप सिंह खाचरियावास, रघु शर्मा, शकुंतला रावत, रामलाल जाट, जाहिदा खान, अशोक चांदना, राजेंद्र यादव, धीरज गुर्जर, हरीश चौधरी, रफीक खान, रामेश्वर डूडी सुद्धा हजर होते. विशेष म्हणजे गेहलोत मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यसह उपस्थित होते.

काँग्रेससाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सचिन पायलट आणि गेहलोत एकत्र येणे हे काँग्रेससाठी चांगले लक्षण मानले जात असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. निवडणुकीची रणनीती आणि संघटनेशी संबंधित मुद्दे ठरविण्यासाठी आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बैठक होत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत या बैठकीत सहभागी झाले आहेत. यावेळी काही काळ व्हिडिओ आणि फोटोंसाठी प्रसार माध्यमांना आमंत्रित करण्यात आले होते. गेहलोतजीही या बैठकीत सहभागी आहेत, त्यांना लॅपटॉपमध्ये दाखवा, असे राहुल गांधी यांनी हलक्याफुलक्या भाषेत पत्रकारांना सांगितले. यावर नेते म्हणाले की, मोठा स्क्रीन आहे, त्यावर तुम्ही पाहू शकता.

काँग्रेस पक्षाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीचा एकमेव मुख्य अजेंडा विधानसभा निवडणूक आहे. राजस्थानचा अभिप्राय घेतला जाईल आणि आगामी रणनीतीवर चर्चा केली जाईल. त्याचबरोबर नेत्यांशी २ ते ५ मिनिटे बोलण्याची संधी सर्वांना देण्यात येणार आहे. यापूर्वी छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्येही याच धर्तीवर बैठक झाली होती. म्हणजे आजही राज्याबाबत कोणताही मोठा निर्णय अपेक्षित नाही. आज केवळ काँग्रेसच्या सध्याच्या आणि भविष्यातील परिस्थितीवर राज्यभर चर्चा होणार आहे.

News Title : Rajasthan Politics Rahul Gandhi Meeting check details on 06 July 2023.

हॅशटॅग्स

#Rajasthan Politics(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x