14 December 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

सभागृहात खटला चालवू नका | गोस्वामींवरील गुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला नाही - अनिल परब

Minister Anil Parab, Devendra Fadnavis, Assembly winter session, Arnab Goswami case

मुंबई, १५ डिसेंबर: रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत (Republic TV Arnab Goswami and Kangana Ranaut case) हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,’ असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.

अर्णब गोस्वामींविरोधात कारवाई करण्यासाठी राज्यात ५० कायदे आहेत. पण आपण काय केलं? त्यांची बंद झालेली केस ओपन केली. हे चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले. या सरकारविरोधात एक वाक्यही बोललं तरी गुन्हा दाखल केला जातो. मुस्कटदाबीचा हा प्रकार आहे. आमच्या काळातही आमच्याविरोधात बोललं गेलं. पण आम्ही कुणाविरोधात गुन्हे दाखल केले नाही. पण या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकलं जातं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच करायला हवा. विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी चालेल. त्यासाठी विरोधी पक्ष सक्षम आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

“अर्णब गोस्वामीने माझ्याविरोधातही ट्रायल चालवलं (Arnab Goswami had also conducted a trial against me said Devendra Fadnavis) होतं. तीनवेळा चालवलं होतं. एकदा तर मी अमेरिकेत असताना गुंतवणूकदारांची भेट घेत असताना ते कॅमेरे वेगळंच काम करत होते. याचा अर्थ भारतात आल्यावर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. तर भारतात येऊन उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या देशात कायदा आहे,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान शिवेसना आमदार अनिल परब यांनी फडणवीसांना सभागृहात खटला चालवू नका असं सांगत विरोध दर्शवला. अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला नाही असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विरोध केला असता यावेळी सभागृहात गोंधळ झाला. यामुळे विधानसभा अध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली. Minister Anil Parab reply to Devendra Fadnavis during assembly winter session over Arnab Goswami case news updates.

 

News English Summary: Shiv Sena MLA Anil Parab protested against Fadnavis not to prosecute him in the House. He said the case against Arnab Goswami had not been quashed by the Supreme Court. When BJP MLA Atul Bhatkhalkar protested, there was a commotion in the House. This forced the Speaker of the Assembly to intervene.

News English Title: Minister Anil Parab reply to Devendra Fadnavis during assembly winter session over Arnab Goswami case news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x