27 April 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

भाजप नेते मोहित कंबोज यांना घेरून त्यांच्यावरील ईडी, सीबीआय केसेस संदर्भात प्रश्न न विचारता माध्यमांनी विरोधकांना घेरलं, नेटिझन्सकडून संताप

Mohit Kamboj

Mohit Kamboj | ५७ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जून २०२० मध्ये मुंबईतील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने छापा टाकलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मोहित कंबोज यांचे निवासस्थान होते. त्यावेळी एका खासगी कंपनीसह आरोपींच्या निवासी आणि अधिकृत परिसरात शोध घेण्यात आला होता. या छाप्यात मालमत्ता, कर्ज, विविध बँक खाती आणि लॉकरच्या चाव्या यासह संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

बँक ऑफ इंडियाची तक्रार आणि सीबीआयने एफआयआर :
बँक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. ज्यांच्याविरोधात बँकेने तक्रार केली होती, त्यापैकी एव्हियन ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, जी आता मेसर्स बागला ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते.

या तक्रारीत भाजपचे नेते मोहित कंबोज, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केबीजे हॉटेल्स गोवा प्रायव्हेट लिमिटेड, जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बागला, इरतेश मिश्रा आणि अज्ञात अधिकाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांवर बँक ऑफ इंडियाला ५७.२६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

राष्ट्रवादीचा इशारा :
मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे. ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का, असा संतप्त सवाल करत त्याच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CBI case on BJP Leader Mohit Kamboj check details 17 August 2022.

हॅशटॅग्स

#Mohit Kamboj(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x