18 June 2021 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
x

पंढरपूर; आपण राजकारणात किती अपरिपक्व आहोत याचे उद्धव यांनी दर्शन घडवले: रा.स्व. संघ

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर ‘तरुण भारत’मधून आरएसएसने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. तुम्ही राजकारणात किती अपरिपक्व आहात याच पंढरपुरातील भाषणादरम्यान दर्शन झाल्याची जळजळीत टीका आरएसएसने त्याच्या मुखपत्रातून केली आहे. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आयोध्येनंतर पंढरपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक लक्ष केलं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर ‘तरुण भारत’मधून आरएसएसने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलण्याचे सुद्धा भान नाही आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत जनताच त्यांना फळ देईल अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे. अग्रलेखात असं म्हटलं आहे की, ‘उद्धव ठाकरेंना काय बोलावे आणि काय बोलू नये, आपण काय करत आहोत, काय करायला पाहिजे याचे साधे भान त्यांना राहिलेले नाही. उद्धव ठाकरे सरकारला चोर बोलतात याचा अर्थ ते स्वतःच्या मंत्र्यांना आणि पक्षालाही चोर बोलतात. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना वाटते आहे की आपण काय करतो आहोत ते सामान्य जनतेला कळत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत जनता त्यांना धुळीत मिळविल्या शिवाय राहणार नाही.

देशाचा पहारेकरी चोर आहे, असे बोलून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची री ओढत देशाच्या पंतप्रधानपदाचा सुद्धा अपमान केला. परंतु, राजकारणात आपण किती अपरिपक्व आहोत याचे सुद्धा त्यांनी पंढरपुरात दर्शन घडवले. तसेच सरकारमध्ये राहण्याचे मोह सुद्धा शिवसेना आवरू शकत नाही आणि सत्ता सोडण्याची हिम्मत सुद्धा शिवसेनेत नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरील शेलक्या आणि दर्जाहीन भाषेतील टीका पाहता शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची लायकी समजते, असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांवर सुद्धा बोचरी टीका केली आहे. १८-१८ तास काम करणाऱ्या पंतप्रधानांवर जर शिवसेना पक्षप्रमुख कुंभकर्ण म्हणून टीका करणार असतील तर ते आंधळे आहेत. तसेच जर सर्वकाही समोर दिसून ते काहीच दिसत नसल्यासारखे करत असतील तर ते मोठे ढोंगी आहेत, असच म्हणावे लागेल अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे आजच्या तरुण भारत मध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नेत्यांबद्दल?

 

हॅशटॅग्स

#RSS(59)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x