26 May 2022 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

त्यांनी मनसेची चड्डी काढण्याची भाषा केली; राज ठाकरेंनी भाजपचीच चड्डी भर सभेत काढली

Raj Thackeray, MNS

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची पोलखोल काल सोलापूरच्या जाहीर सभेत केली. या संदर्भातला व्हिडिओ काल राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जनतेसमोर सादर केला. दरम्यान, सरकारच्या या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणच राज ठाकरेंनी मनसेच्या मंचावर आणला. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका मुलाखतीतील हरिसाल आणि राज ठाकरे यांच्याबद्दलची क्लिप लोकांना ऐकवली होती. संबंधित तरूणाला भारतीय जनता पक्षातील कार्येकर्ते शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये.

परंतु हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्री म्हटले की राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत. आता हा तरूणच मी तुम्हाला दाखवला आहे तसंच तिथली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

हरिसाल या गावात डिजिटलचा ‘ड’ देखील नाही हे वास्तव राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात दाखवलं होतं. त्यानंतर या गावासंदर्भातला व्हिडिओच राज ठाकरेंनी सादर केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या गावाची पुराव्यासहित पोलखोल केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी तो व्हिडिओ दाखवून डिजिटल गावाची पोलखोल केली आणि तरूणालाच मंचावर आणत भारतीय जनता पक्षाच्या दाव्यांना धक्का दिला.

राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले.मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या, कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. एवढंच काय तर डिजिटल गावाची जाहिरातही त्या गावात नाही तर भलतीकडेच शूट झाली होती असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे. डिजिटल गावाच्या जाहिरातीत मॉडेल असलेला मुलगा नोकरीसाठी पुण्यात वणवण फिरतो आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसनपूर्वी एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची चड्डी उतरविण्याची भाषा करत उपरोधकपणे टीका केली होती. परंतु काल राज ठाकरे यांनी भाजपच्या जाहिरातीतील मॉडेलला भर मंचावर बोलावून त्याच्या खांद्यावर हात ठेवून अप्रत्यक्षपणे भाजपाची चड्डी काढली अशी चर्चा उपस्थितीतांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x