त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेचं तिकिट दिलं - चंद्रकांत पाटील
मुंबई, १३ मे: “भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सांगताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकिट का नाकारण्यात आलं याची कारणमीमांसा केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
पुढे ते म्हणाले की, कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन मोठे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. दोन तरुण आणि एक वरिष्ठ नेता काँग्रेसला रामराम करणार असल्याचं पाटील म्हणाले. मात्र अज्ञानात सुख असतं असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं. काँग्रेस राज्यातल्या सरकारमध्ये आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्ष कुठेच दिसत नाही. केवळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतात. त्यातही टोपे सध्या बोलतच नाहीत, तर मुख्यमंत्री फक्त घरूनच बोलतात. या सगळ्यात काँग्रेस कुठे आहे, असा सवाल पाटील यांनी विचारला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील मुलाखतीत पुढे म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तिकिट माघितली नव्हती. गोपीनाथ पडळकर यांना विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाजपाने घोड्यावर बसवलं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, खडसेंनी पुन्हा पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांतदादा विद्यार्थी परिषदेमधून पक्षात आले. त्यांना पक्षाचा इतिहास माहीत नाही. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचं योगदान शून्य असल्याचं खडसे म्हणाले.
News English Summary: Gopichand Padalkar did not ask for a ticket to fight against Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar. BJP put Gopinath Padalkar on horseback to fight against Ajit Pawar in the Assembly elections, said Chandrakant Patil.
News English Title: BJP Leader Gopichand Padalkar did not ask assembly ticket his own against Ajit pawar said BJP State President Chandrakant Patil News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा