27 April 2024 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मुंबईत बसून सांगलीचा आढावा घेणारे पालकमंत्री सुभाष देशमुख आज दुपारी सांगलीत प्रकटणार

Sangali Flood, Kolhapur Flood, Minister Subhash Deshmukh

सांगली: राज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून त्यांना लक्ष करण्यात येत आहे.

दरम्यान, सुभाष देशमुख राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री असूनही आधी नाशिक, नंतर पुणे, नंतर कोल्हापूर, नंतर कोकण आणि आता सांगली अशा ५ राज्यांमध्ये पावसानं जनसामान्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. परंतु, तरीदेखील सुभाष देशमुख मात्र कुठेही पाहाणी करताना दिसले नाहीत. अखेर, शुक्रवारी त्यांना वेळ मिळाला असून ते दुपारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुभाष देशमुख एकामागोमाग पूरग्रस्त भागावर लक्ष ठेऊन असल्याचे फोटो ट्वीट करत होते. मात्र, प्रत्यक्ष त्या घटनास्थळावर ते दिसले नाहीत. विशेष म्हणजे सांगलीतील आपत्तीचा आढावा ते मुंबईत बसून घेत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x