पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.

राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळांचे समायोजन करताना सरकारकडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असून शाळा बंद करताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिरूर तालुक्‍यातील भिल्लवस्तीमधील शाळा बंद करून सरकारने तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. परंतु, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल ३ किलोमीटर पायपीट करत पोहोचावं लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांच सुद्धा तेच होणार आहे.

महाराष्ट्रातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती व जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. परंतु त्यातून विद्यार्थ्यांची केवळ फरफट होणार असून, सरकारकडून ती फरफट दुर्लक्षित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासाचा विचार सरकारने “पालक’ म्हणून केलाय का?, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (कि.मी)
बागलफाटा : बावडा : २.५
शास्ताबाद तालुका शिरूर: उकीरडेवस्ती : १.७
पवारवस्ती तालुका इंदापूर: वायसेवाडी : ०२
भिल्लवस्ती तालुका शिंदोडी : २.९
वेलहावळे तालुका खेड: काळोखेवस्ती : १.८

what i spoke a lie supriya sule asked a question to vinod tawde