5 August 2020 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज ठाकरेंकडून स्व. बाळासाहेबांची आठवण काढत न्यायालयीन लढाईसाठी मोदींचे अभिनंदन कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच - महंत सत्येंद्र दास सुशांत प्रकरण: अमृता फडणवीस यांची पुन्हा अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका लहान आहेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे - नारायण राणे हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही - नारायण राणे दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आलं, तीने आत्महत्या केली नाही - नारायण राणे
x

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एका युवा मंत्र्याचा दबाव - आ. अतुल भातखळकर

Sushant Singh Rajput, suicide pressure, Mumbai police, MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, ३१ जुलै : भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटलं की,”अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना केली आहे. ”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पार्थ अजित पवार यांनीही अशीच मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य रितीनं करत नसल्याची शंका राज्यातील जनतेमध्ये निर्माण होत आहे. राज्य मंत्रीमंडळातील मुंबईत राहणाऱ्या युवा मंत्रीचा स्वार्थ या प्रकरणात दडला आहे, अशी चर्चा असल्याचे सुशांतच्या बहिणीने म्हटलंय, असेही भातखळकर म्हणाले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नसल्याने सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे, असंही भातकळकर म्हणाले आहेत.

 

News English Summary: BJP MLA Atul Bhatkhalkar tweeted a video on Friday. In it, he said that the Mumbai police could not conduct an impartial inquiry as there was pressure from a young minister in the state to investigate the Sushant Singh Rajput suicide case.

News English Title: Sushant Singh Rajput suicide pressure on Mumbai police by young minister alleges BJP News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x