24 April 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

हडपसरची जागा मनसे खेचून आणणार असल्याने भाजप हडपसर सेनेला देणार?

Hadapsar, Tatya, MNS Vasant More, MNS Corporator Vasant More, MLA Yogesh Tilekar

पुणे : शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपाचा तिढा अजून संपलेला नसतात काही जागांच्या अदलाबदलीची कारणं त्यासाठी पुढे करण्यात आली आहेत. पुण्यात भाजप सेनेला ठेंगा देण्यात तयारीत असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र शिवसेना पुण्यात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असल्याने भाजप हाती न येणाऱ्या पुण्यातील जागा शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिवसेनेचे युतीचे ठरले असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. या बदलाचा फटका भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना बसण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात सर्वांच्या सर्व म्हणजे तब्बल ८ मतदारसंघांत सर्वांच्या सर्व भाजपचे आमदार आहेत. मात्र शिवसेनेला येथे जराही संधी नसल्याने एकूण जागांपैकी कमीत कमी २ तरी मतदारसंघ द्यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडील हडपसर हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मात्र त्या मोबदल्यात शिवसेनेकडे असलेला इंदापूर हा मतदारसंघ भाजपाला देऊन येथून माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना देण्याची योजना आहे.

विधानसभेच्या २००९ च्या जागावाटपात इंदापूर हा शिवसेनेकडे होता. मात्र २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वबळावर लढले. त्यामुळे इंदापूरवर शिवसेनेनेच दावा केला होता. परंतु, येथे काॅंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडवून घेणे आवश्यक होते. त्यानुसार येथे शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार नाही. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे समजते.

विद्यमान आमदारांच्या जागा न सोडण्यावर भारतीय जनता पक्ष आजही ठाम आहे. परंतु नव्याने पक्षात आलेल्या दिग्गज आयात नेत्यांसाठी काही जागांवर तडजोड करण्यात आली आहे. पुण्यासारख्या शहरात अस्तित्व नसणे पक्षाला परवडणार नसल्याने शिवसेना किमान २ जागांवर तडजोड करण्यास तयार आहे. दरम्यान शिवसेनेकडून हडपसरमध्ये माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक नाना भानगिरे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आल्याचे वृत्त आहे. यावर शिवसेना नेते बोलत असले तरी विद्यमान आमदारांचे समर्थक मानण्यास तयार नाहीत मात्र ते सत्यात उतरल्यास भाजप आमदार टिळेकर यांचा पत्ता कट होणार आहे. आता इतर सात मतदारसंघांत भाजप चेहरे बदलणार का, याची उत्सुकता राहील. खडकवासला मतदारसंघासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही होेते. तो मतदारसंघ सेनेला न मिळाल्यास काही नेते पक्षांतर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, हडपसर येथे विद्यमान आमदार असताना देखील भाजप या जागेवर सहज पाणी सोडत नसून त्याला भाजपचे अंतर्गत सर्व्हे कारणीभूत असल्याचं वृत्त आहे. त्याच अंतर्गत सर्व्हेनुसार हडपसरच्या जागेवर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी मागील २-३ वर्षांपासून मोठी मोर्चेबांधणी केली आहे. तसेच आमदार योगेश टिळेकर यांचे अनेक घोटाळे त्यांनी उघड केल्याने सध्या टिळेकरांसाठी ही जागा सोपी नाही. दरम्यान,मागील काही दिवसांपासून वसंत मोरे यांनी विरोधकांना जेरीस आणण्या व्यतिरिक्त मतदारसंघात विकास कामांचा देखील धडाका लावला आहे. मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे आक्रमक कार्यकर्त्यांची फौज आणि आर्थिक रसद असल्याने हा मतदासंघ मनसे भाजपकडून खेचून आणणार असल्याचं समोर आल्याने, भाजप हडपसरची जागा सेनेला देत इस्लामपूर घेण्याच्या तयारीत आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x