7 July 2020 8:45 PM
अँप डाउनलोड

मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेत एकत्र आल्यास गणित बदलणार: सविस्तर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असं जाहीर केलं असलं तरी राजकारणात सर्व काही शक्य असत. केवळ विषय येतो तो पक्षाची मिळती जुळती विचारधारा आणि दोघांचे मूळ मतदार कोण याचाच. त्याचा विचार करता भविष्यात जर ही युती झाल्यास ते अनेकांची गणित बिघडू शकतात. इतकंच नाही तर उद्या ह्या युतीने थेट कर्नाटक सारखा चमत्कार केल्यास आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. राणे आज खासदार असून त्यांचे पुत्र नितेश राणे सुद्धा आमदार आहेत. स्वाभिमान संघटनेचं राज्यभर कार्यकर्त्यांचं जाळ असून, त्याच्याकडे प्रत्येक जिल्हा पातळीवर आक्रमक कार्यकर्त्याची फौज आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नारायण राणे हे ‘मराठा समाजाचा’ चेहरा म्हणून परिचित असून ते सरकारने नेमलेल्या मराठा समाज्याच्या आरक्षणा संबंधित समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत.

माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांची आजही कोकणच्या राजकारणावर पकड आहे हे वास्तव आहे. विशेष म्हणजे राणेंना मानणारा कोकणातील २२ टक्के इतकी लोकसंख्या असलेला भंडारी समाज सुद्धा त्याच्याशी जोडलेला आहे. कोकणातील लोकं ही मोठ्याप्रमाणावर मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या भागात वास्तव्यास आहेत.

सध्या कोकणच्या निसर्गात नाणार रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदार असतानासुद्धा आल्याने शिवसेनेविरोधात कोकणात प्रचंड रोष आहे. त्याच रोषाचे परिमाण कोकणा बरोबरच मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या भागात शिवसेनेला भोगावे लागू शकतात. त्यात जर भविष्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती होऊन एकत्र सभा झाल्या तर त्यातून निर्माण होणारा झंझावाद मात्र शिवसेनेची आणि भाजपची दमछाक करेल. शिवाय राज ठाकरे, नारायण राणे, नितेश राणे हे आक्रमक नेते जर महाराष्ट्रभर जास्तीत जास्त सभा घेऊन सर्व मतदार संघ पिंजून काढण्यात यशस्वी झाले तर मोठं यश पदरात पाडून थेट कर्नाटक नीती अवलंबली जाऊ शकते.

राणे हे ‘मराठा समाजाचा’ चेहरा आणि राज ठाकरे हे ‘मराठी’चा चेहरा म्हणून राज्यभर परिचित असल्याने भव्य सभांमधून रान पेटवून सर्व गणित बदलण्याची शक्यता या युतीत आहे. राज ठाकरेंचे आक्रमक महाराष्ट्र सैनिक आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या फौजा एकत्र आल्यास ते दोन्ही पक्षात चैतन्य निर्माण करणार ठरू शकत.

‘ते जुने’ राज ठाकरे जर प्रचार सभांमध्ये आक्रमक झाले तर संपूर्ण वातावरण बदलून टाकण्याची ताकद त्यांच्या भाषणात आहे हे सर्वश्रुत आहे. मनसेची ताकद ग्रामीण भागात सुद्धा वाढताना दिसत असून ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सुद्धा राज ठाकरेंबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेची मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद बरोबर अनेक शहरी आणि ग्रामीण भागात चांगली ताकद असून त्यांनी काही महिन्यापासून राज्यभर दौरे करून पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांची फळी उभारण्यावर भर दिला आहे. त्याच मनसेच्या कार्यकर्त्यांच्या फळीला जर स्वाभिमानच्या आक्रमक कार्यकर्त्यांची जोड मिळाल्यास प्रचारात चांगलीच रंगत येऊ शकते.

राज ठाकरे आणि नारायण राणे हे महाराष्ट्रातील दोन मोठे नेते आणि त्यांचे पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत राज्यातील समीकरण बदलली तर आश्चर्य वाटायला नको. विद्यमान भाजप आणि शिवसेना सरकारच्या कारभारावर सामान्य नाराज असून काँग्रेस पक्षाकडे राज्यस्तरावरील चेहराच नसल्याने ते आगामी निवडणुकीत राज्यात काही विशेष कामगिरी करू शकतील अशी शक्यता आज तरी नाही. त्यात राष्ट्रवादीची कामगिरी जरी चांगली झाली तरी काँग्रेसमुळे ते झाकलं जाण्याची शक्यता अधिक दुणावतो. त्यामुळे नजीकच्या काळात काय होते ते पाहावे लागेल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x