24 September 2023 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

ICSE बोर्डाचे सीईओ व आदित्य ठाकरेंची भेट; मुंबई पालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणार

Minister Aaditya Thackeray, ICSE Board of education CEO Gerry Arathoon, BMC School Standard

मुंबई, १२ मार्च: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची आज आयसीएसई शिक्षण बोर्डाचे सीईओ गॅरी अरॅथॉन यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आयसीएसई दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करत असून, त्यानिमित्त ही भेट झाल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे.

दरम्यान, भविष्यात बीएमसी शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जातील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मुंबई पब्लिक स्कूलच्या लोगोचे अनावरण केलं होतं. बीएमसी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना बीएमसी शाळांकडे खेचण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या या व्हिजनमध्ये उद्धव ठाकरे यांची त्यांना खूप साथ लाभत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई पब्लिक स्कूलसह २२३ माध्यमिक शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आहे. लहान मुलांसाठी देखील विशेष शाळा सुरू करण्यात आल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या लोगोचे अनावरण केलं होतं. त्यावेळी त्यांनी बीएमसीच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते आणि यातून सामान्य घरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता.

त्यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आधुनिक अभ्यासक्रमांच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विविध महत्त्वाच्या व्यक्तींच्या मदतीने ‘लेट्स रीड’ कार्यक्रम राबविला जाईल. बीएमसीच्या सीबीएसई आणि आयसीएसई संलग्न शाळांमध्ये मार्चच्या मध्यापासून प्रवेश सुरू होईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. जोगेश्वरीच्या पूनम नगरमध्ये सीबीएसई बोर्डाची पहिली बीएमसी शाळा आणि माहीममधील आयसीएसईची पहिली बीएमसी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या शाळांमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांची ऍडमिशनसाठी रीघ लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील संकल्पनेवर आदित्य ठाकरे काम करत आहेत आणि त्यात सातत्य आणि गुणवत्ता राखली गेल्यास मुंबई तसेच कालांतराने राज्यात दर्जेदार शाळा उभारणं गरजेचं असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे.

 

News English Summery: Environment Minister Aditya Thackeray had a long discussion with ICSE Education Board CEO Gary Arathon today. Aditya Thackeray is trying to get ICSE quality education in the schools of Mumbai Municipal Corporation.

 

Web News Title: Story Environment Minister Aaditya Thackeray met ICSE Board of education CEO Gerry Arathoon.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x